Pune, ज्ञानेश्वर मोरेयांच्याविषयी: पुणे शहरात वाहन चोरट्यांनी उच्छांद घातला असून, गेल्या दोन दिवसात विविध भागातून तब्बल १३ दुचाकींची चोरी झाली असल्याची नोंद पुणे पोलिसांकडे आहे. ही फक्त नोंद झालेली आकडेवारी म्हणता येईल. नोंद न झालेली आकडेवारी वेगळीच म्हणता येईल. मात्र, शहरात वाहन चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातल्याचे दिसत आहे.
शहरातील हडपसर, बंडगार्डन, विश्रामबाग, भारती विद्यापीठ, अलंकार तसेच येरवडा पोलीस ठाण्यात रविवारी सात गुन्हे नोंद झाले आहेत. तर, शनिवारी ६ दुचाकी चोरीचे गुन्हे येरवडा, चंदननगर, वानवडी, हडपसर, भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत झाले आहेत. गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी पोलिसांकडून लक्ष केंद्रीत केले जात आहे. गुन्हेगारांवर कारवाई सुरू असताना मात्र दुसरीकडे शहरात सराईत वाहन चोरांनी उच्छाद मांडल्याचे चित्र आहे. घराजवळ, सोसायटी किंवा कार्यालयाच्या बाहेर पार्क केलेल्या गाड्या चोरीला जाण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे खर्या अर्थाने वाहन चोर्या रोखण्याचे आव्हान पुणे पोलिसांसमोर आहे.
वाहन चोरी विरोधी पथक आहे ना?
वाहन चोरट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी वाहन चोरी विरोधी दोन स्वतंत्र पथके असून, त्यांची शहरातील दोन भागात विभागणी देखील केलेली आहे. त्यानूसार, त्यांनी काम करणे अपेक्षित आहे. मात्र, वाहन चोरी विरोधी पथकांना वाहन चोरींच्या गुन्ह्याचा छडा लावण्यात अपयश येत असल्याचे वास्तव आहे. अधून-मधून एखाद दुसरी कारवाई करून ही पथके समाधानी आहेत. त्यामुळे ही पथके फक्त नावालाच आहेत की काय असा प्रश्न निर्माण होत आहे.
दोन दिवसात या भागातून चोरल्या दुचाकी
विश्रामबाग – २
बंडगार्डन-१
भारती- २
अलंकार १.
येरवडा- २
हडपसर- २
कोरेगांव पार्क१
चंदननगर- १
वानवडी– १
ज्ञानेश्वर मोरेयांच्याविषयी: ‚नवराष्ट्र’मध्ये सीनिअर कंटेट रायटर म्हणून काम करत आहे. गेल्या 6 वर्षांपासून डिजिटल मिडिया क्षेत्रात व्हिडीओ रिपोर्टींगसह कार्यरत. राजकीय नेत्यांच्या मुलाखती घेण्याचा अनुभव. अनेक विषयांवर विस्तृत आणि सविस्तर लिखाण करण्याचं कौशल्य. कृषी, क्राईम आणि राजकीय विषयांमध्ये सखोल लिखाण व व्हिडीओ रिपोर्टींगची आवड.